येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचा माजी विद्यार्थी अक्षय जाधव याला राणीचा प्रतिष्ठेचा तरुण नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला असून त्याने नायजेरियातील वंचित विद्यार्थी व आदिवासींच्या सहकारी संस्थांच्या उत्थानासाठी  त्याने मोठे काम केले आहे. अक्षय याने जगातील अनेक संघटनात काम केले आहे.
विदर्भातील ग्रामीण भागात वाहतूक, मूलभूत शिक्षण या सेवा नसताना व इंटरनेट उपलब्ध नसताना त्याने शिक्षण व कौशल्य सुविधा वर्ग सुरू केले. पुरस्कारार्थीला इंग्लंडमध्ये एक आठवडय़ाचा निवासी अभ्यासक्रम दिला जातो व शिवाय राणीचा पुरस्कारही प्रदान केला जातो.