टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे. जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते. आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

बिल गेट्स हे यांच्या श्रीमंताच्या यादीतील दुसरा क्रमांक हा दुसऱ्यांदा दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर नोंदवला गेला आहे. बिल गेट्स खरंतर अनेक वर्षांपासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांनी २०१७ मध्ये पहिला क्रमांक मिळवला. यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आले. आता हा दुसरा क्रमांक एलन मस्क यांनी मिळवला आहे.