07 April 2020

News Flash

इंधनासाठी उसळली दंगल, सरकारने लादली आणीबाणी

निदर्शन करणाऱ्यांच्या मते सरकारचा इंधन अनुदान बंद करण्याचा निर्णय अयोग्य आहे.

इंधनावरील सबसीडी बंद करताच या ठिकाणी सुरू झाल्या दंगली जगभरात सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहात आहेत. या मंदी सदृष्य परिस्थितीत टिकून राहाण्यासाठी अनेक देश आपल्या आर्थिक नियोजनात विविध प्रकारचे बदल करत आहेत. परंतु भविष्यकाळ सुरक्षित राहावा यासाठी केले जाणारे हे बदल वर्तमानात मात्र अनेकदा नागरिकांसाठी त्रासदायक ठरतात. अशीच काहीशी परिस्थिती इक्वाडोर या देशात निर्माण झाली आहे.

इक्वाडोर येथे वित्तीय धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने दोन बिलियन डॉलर्सची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेले इंधनावरील विशेष अनुदान बंद करण्यात आले आहे. इंधनावरील अनुदान बंद करताच देशात दंगली उसळल्या आहेत. देशातील विविध भागात लोक रस्त्यावर उतरुन तोडफोड करत आहेत. प्रदर्शन करणाऱ्यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. जागोजागी आगी लागल्या जात आहेत. दंगल करणाऱ्या नागरिकांना नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.

निदर्शन करणाऱ्यांच्या मते सरकारचा इंधन अनुदान बंद करण्याचा निर्णय अयोग्य आहे. हे अनुदान त्यांना गेली अनेक वर्षे मिळत होते. परंतु जनतेला विश्वासात न घेता घेतला गेलेला हा निर्णय म्हणजे देशवासीयांवर अन्याय आहे. तसेच जो पर्यंत सरकार अनुदान पुन्हा एकदा सुरु करत नाही. तो पर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा निदर्शनकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 5:58 pm

Web Title: emergency over fuel price protests mppg 94
Next Stories
1 मोदींच्या स्वच्छता मोहिमेची चर्चा पण खऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याभरापासून पगारच नाही
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे अंबानी, अदाणींचे लाऊडस्पीकर : राहुल गांधी
3 अर्थमंत्री सीतारमन यांचे पतीच म्हणतात, देशाची अर्थव्यवस्था ठीक नाही
Just Now!
X