News Flash

मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच आणीबाणी लागू केली होती

३ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांनी राज्यघटना बरखास्त करून आणीबाणी जाहीर केली होती

| December 24, 2015 02:14 am

मुशर्रफ यांचा दावा
देशातील नागरी व लष्करी नेतृत्वाच्या सल्ल्यानेच आपण २००७ मध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे.
३ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांनी राज्यघटना बरखास्त करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याप्रकरणी २०१३ पासून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे. त्यांनी संघराज्य चौकशी संस्थेच्या पथकासमोर असे सांगितले, की मी आणीबाणी लागू करण्यापूर्वी माजी लष्करप्रमुख परवेझ कयानी यांच्याशी सल्लामसलत केली होती.
कयानी हे ७ नोव्हेंबर २००७ रोजी लष्कर प्रमुख झाले होते, त्यांनी आणीबाणीचा फेरविचार केला नाही, त्यामुळे तेही तेवढेच गुन्हेगार आहेत. आणीबाणी लागू करण्यापूर्वी तेव्हाचे पंतप्रधान शौकत अझीज यांच्याशी सल्लामसलत केल्याचा दावाही मुशर्रफ यांनी केला आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच मी आणीबाणी जाहीर केली होती त्यामुळे मी त्याला जबाबदार नाही. अझीज यांनी आणीबाणीबाबत केलेली टिप्पणीवजा नोंद आश्चर्यकारक रीत्या नोंदीतून काढून टाकण्यात आल्याचे मुशर्रफ यांनी स्पष्ट केले. मुशर्रफ यांनी आणीबाणी प्रकरणात कयानी व शौकत अझीज यांना ओढले आहे पण कयानी यांनी मुशर्रफ यांच्या आरोपाला काही उत्तर दिलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 2:14 am

Web Title: emergency was imposed on cabinet advice
Next Stories
1 चीनच्या रोव्हरला चंद्रावर वेगळा खडक सापडला
2 दादरी हत्याकांडप्रकरणी आरोपपत्र दाखल
3 स्वत:चे वक्तव्य वगळण्याची लोकसभा अध्यक्षांवर वेळ!
Just Now!
X