News Flash

अबब… या आजोबांच्या वयाची Guinness World Record नेही घेतली दखल

प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे

112-year old Emilio Flores Marquez is world's oldest living man
१९०८ मध्ये झाला मार्केझचा जन्म (photo: Guinness World Records)

प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे. एमिलियो फ्लोर्स मार्केझ असं त्यांच नाव आहे. सध्या त्यांच वय ११२ वर्ष ३२६ दिवस आहे. जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बुधवारी याची घोषणा केली. मार्केझचा जन्म १९०८ मध्ये पोप्यूर्टो रिकान राजधानी कॅरोलिना येथे झाला होता.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर मार्केज एका मुलाखतीमध्ये म्हणाले, “माझ्या वडिलांनी मला प्रेमाने वाढवले ​​आणि प्रत्येकावर प्रेम करणे शिकवले. त्यांनी नेहमीच मला व माझ्या भावांना आणि बहिणींना चांगले कार्य करण्यास सांगितले होते, आणि असेही म्हटले होते की ‘मसीहा’  नेहमीच आपल्यात जीवंत असतो”

हेही वाचा- Viral Video : ठळक बातम्या वाचताना Live Telecast दरम्यान अँकरने केली पगाराची मागणी

आपल्या ११ भावंडांमधील दुसरा मोठा भाऊ आणि मार्केझने ऊस शेतात आपल्या कुटुंबासाठी काम केले आणि फक्त तीन वर्षे शाळेत शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांची पत्नी एंड्रिया प्रेज डी फ्लोर्स यांचा २०१० मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केझ पूर्वी  रोमेनियाच्या डुमित्रू कोमेनेस्कुने सर्वात वयस्कर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. परंतु २७ जून २०२० रोजी त्यांचे वयाच्या १११ वर्ष २१९ दिवसांनी निधन झाले. त्यानंतर मार्केझने हा नवीन विक्रम केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 1:25 pm

Web Title: emilio flores marquez confirmed as the world oldest man living at 112 srk 94
टॅग : International News
Next Stories
1 चीनवर दादागिरी कराल तर डोकं ठेचू – शी जिनपिंग यांचा जागतिक सत्तांना इशारा
2 खाद्यतेल स्वस्त होणार; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय
3 कोणताही व्हेरिएंट येवो, दो गज दुरी; मास्क है जरुरी!
Just Now!
X