02 March 2021

News Flash

लोकसभा निवडणुकांआधी नोकरदारांना दिलासा, पीएफच्या व्याजदरांमध्ये वाढ

नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे

संग्रहित

लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातल्या नोकरदारांना दिलासा दिला आहे. पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवर ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ही वाढ लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पीएफवरचा व्याज दर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के झाला आहे. गुरुवारी ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टची बैठक पार पडली. या बैठकीत पीएफवरील व्याज दर वाढवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. नोकरदारांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 5:21 pm

Web Title: employees provident fund organisation has hiked interest rate on employees provident fund to 8 65 from 8 55 for the 2018 19 fiscal year
Next Stories
1 २०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद
2 ‘राहुल गांधी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागतात, मात्र लंडनच्या हॅकरची सत्यता तपासत नाहीत’
3 पाकिस्तानला जाणाऱ्या तीन नद्यांचं पाणी रोखू, नितीन गडकरींचा इशारा
Just Now!
X