31 October 2020

News Flash

ईपीएफओकडून नोकरदारांना झटका; यंदाही व्याजदरात केली कपात

व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा असताना कपात झाल्याने नाराजी

संग्रहित छायाचित्र

देशातील नोकरदारांना झटका देणारे एक वृत्त असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ साठीच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता तो आता ८.५५ टक्के इतका असणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाच्या ट्रस्टींच्या सभेत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचारी वर्गात मात्र नाराजी पसरली आहे.

नव्या व्याजदराची घोषणा होण्यापूर्वी हाच व्याजदर नव्या वर्षासाठी कायम राहिल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, तसे न होता उलट व्याजदरात कपात करण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. गेल्या वत्तीय वर्षात ईपीएफओला चांगला फायदा झाला आहे. ईपीएफओने याच महिन्यांत तब्बल २८८६ कोटी रुपयांचे एक्सचेंज ट्रेडेड फंड विकले आहेत. मात्र, तरीही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

ईपीएफओने २०१६-१७ साठी ८.६५ टक्के व्याजदर निश्चित केला होता. जो २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के इतका होता. यावरुन सलग तिसऱ्यांदा हा व्याजदर घटवण्यात आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पातही सरकारने नोकरदार आणि मध्यम वर्गीयांसाठी कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही. प्राप्तीकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता ईपीएफओने घेतलेला हा निर्णय नोकरदारांना निराश करणारा ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 10:04 pm

Web Title: employees provident fund organisation lowers interest rates from 8 65 to 8 55
Next Stories
1 तामिळनाडूच्या राजकारणात कमल हसनचा प्रवेश, मदुराईत ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा
2 “एअर इंडिया विकत घ्यायला बकरा मिळत नाहीये”
3 ताजमहाल ही कबरच! शिवमंदिर नाही – पुरातत्व विभाग
Just Now!
X