25 February 2021

News Flash

जम्मू-काश्मीर: कुलगाम येथे सुरक्षादल – दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील रेडवानी परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील रेडवानी परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुलगाम येथील रेडवानी येथे ही चकमक सुरु झाली. अद्याप विस्तृत माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, सोमवारी सुरक्षादलाने गांदरबल जिल्ह्यात राबवलेल्या शोधमोहिमेत एक दहशतवाद्यांचे ठिकाण उद्धवस्त केले. येथून हत्यारे आणि दारुगोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली होती.

गांदरबल पोलीस आणि लष्कराच्या ५ राष्ट्रीय रायफल्सने एका सुचनेवर जिल्ह्यातील गुटलीबाग परिसरात बदरगुंड येथे संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान जंगल क्षेत्रातील अतिरेकी असलेले एक ठिकाण उद्धवस्त करण्यात आले. याठिकाणी रायफल, चार मॅगझीन, आठ काडतुसे, एके-४७च्या ३७ राऊंड आणि १ चायनीज ग्रेनेड जप्त करण्यात आले. त्याचबरोबर खाण्याच्या काही वस्तूही आढळून आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 6:48 am

Web Title: encounter breaks out between security forces and terrorists in redwani area of kulgam jammu and kashmir
Next Stories
1 संयम बाळगा, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहनसिंग यांचा मोदींना सल्ला
2 नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग
3 ब्रेग्झिटसाठी ब्रिटिश संसदेत ११ डिसेंबरला मतदान
Just Now!
X