03 March 2021

News Flash

शोपियनमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, कुपवाडामध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला. कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. जंगल भागामध्ये ही चकमक सुरु आहे.

शोपियनमध्ये लष्कराचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी सदर भाग रिकामी केला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

कुपवाडाच्या जंगल भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये गुरुवार रात्रीपासूनच चकमक सुरु आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी बऱ्याच काळापासून घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. सैन्याने याआधी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 10:20 am

Web Title: encounter in kashmir kupwara area
टॅग : Kashmir
Next Stories
1 Maryland shooting: अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, ५ ठार, अनेक जखमी
2 झोपेच्या समस्यांमुळे महिलांना रक्तदाबाचा त्रास
3 विदर्भाच्या विकासस्वप्नाला तापमान बदलाची तीव्र झळ!
Just Now!
X