दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मागच्या तासाभरापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तिथे स्फोट झाला आहे.

त्रालमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षादलांनी या भागाला घेराव घातला. पहाटे साडेचारपासून दहशतवादी आणि जवानांध्ये चकमक सुरु झाली.

दोन दहशतवादी घरामध्ये लपले असल्याची माहिती मिळाली होती. सध्या गोळीबार थांबला असून शोधमोहिम सुरु आहे. ४२ राष्ट्रीय रायफल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.