News Flash

जम्मू-काश्मीर : त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त, शोधमोहीम सुरू

संग्रहीत

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील त्राल भागात दहशतवादी व जवानांमध्ये  झालेल्या  चकमकीत तीन  दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. याचबरोबर मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी त्यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या भारतीय जवानांच्या चौक्या व गावांना लक्ष केले गेले.

पाकिस्तानकडून रात्री साधारणपणे साडेनऊ वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांनी पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या देगवर सेक्टरमध्ये गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला, त्यांच्या या हल्ल्यास भारतीय जवानांकडून देखील चोख प्रतित्युत्तर देण्यात आले.

यानंतर आज रविवारी त्राल भागात दहशतवाद्यांच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसरास वेढा देत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. प्रतित्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:39 pm

Web Title: encounter underway between security forces and terrorists in tral msr 87
Next Stories
1 CAA : जे गांधीजींनी सांगितलं त्याचं पालन आम्ही केलं – पंतप्रधान
2 जम्मू-काश्मीर : दोन दहशतवाद्यांसह राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक
3 ‘आधी मोदींच्या पित्याचं आणि खानदानाचं जन्म प्रमाणपत्र दाखवा’, अनुराग कश्यपचा हल्लाबोल
Just Now!
X