२८ लाखाहून अधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स एनर्जीने वीजशुल्क भरण्यापासून तक्रारी नोंदवण्यापर्यंत विविध सेवा देणारे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. सध्या हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्राइडवर उपलब्ध असून नोव्हेंबरपासून ओएसवर उपलब्ध होऊ शकेल. कागदाचा कमीत कमी वापर, ग्राहकांना एका ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी, तसेच एका बटनाच्या क्लिकवर वीजशुल्क भरण्याची सोय देणाऱ्या या अ‍ॅपमधून इतरही सुविधा मिळणार आहेत. मीटर रीडिंग, वीजशुल्काची प्रत डाऊनलोड करणे, मागील महिन्यांमधील वीजवापर, शुल्कप्रतीमधील भाषा बदलणे, यासोबतच वीजशुल्क भरण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये करण्यात आलेली आहे. याशिवाय वीज खंडित झाल्याच्या तक्रारी, नोंदणी केलेल्या तक्रारींचा मागोवा या अ‍ॅपमधून घेता येईल.