08 March 2021

News Flash

नीरव मोदीची १७७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई आणि सुरतमधील संपत्तीवर ईडीकडून जप्ती आणण्यात आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदीच्या १७७ कोटींच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्ती आणली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि सुरतमधील संपत्तीवर ईडीकडून जप्ती आणण्यात आली आहे. यामध्ये आठ आलिशान गाड्या, मशिनरी, प्लांट, दागिने, पेंटिग्स आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने निरव मोदींचं खासगी आर्ट कलेक्शनही जप्त केलं असून यामध्ये प्रसिद्ध चित्रकारांच्या पेंटिग्सचा समावेश आहे. अमृता शेर-गिल, एम एफ हुसेन यांच्या पेंटिग्सचा यामध्ये समावेश असून याची किंमत ५० कोटींच्या घरात आहे. गतवर्षी आयकर विभागाने सर्च ऑपरेशन दरम्यान एकूण १७३ पेंटिग्स आणि आर्टवर्क जप्त केले होते.

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यामागे नीरव मोदी असल्याचं समोर आल्यानंतर ईडीने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याविरोधात २४ आणि २६ मे रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. दोघांविरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आलं. इंटरपोलनेदेखील या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत ईडीने भारत आणि परदेशात मिळून ४, ८०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 1:40 pm

Web Title: enforcement directorate attached nirav modis rs 177 72 crore worth of properties
Next Stories
1 Surgical Strike 2: मोदींच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सुरक्षित: अमित शाह
2 भारताच्या शूर वैमानिकांना सलाम, तुमच्यामुळे अनुभवला अभिमानाचा क्षण : केजरीवाल
3 Surgical strike 2: हवाई दलाने अवघ्या २१ मिनिटांमध्ये असा केला हल्ला
Just Now!
X