26 January 2021

News Flash

कर्जबुडव्या विजय मल्ल्यावर आरोपपत्र दाखल! ईडीची कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग तसेच बँकांना ६,०२७ कोटी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

विजय मल्ल्या (संग्रहित छायाचित्र)

देशातील बँकांची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग तसेच बँकांना ६,०२७ कोटी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपपत्राच्या आधारे न्यायालय फरार आर्थिक अपराधी अध्यादेशा अंतर्गत मल्ल्या आणि त्याच्या कंपनीची नऊ हजार कोटी रूपयांहून अधिक किमतीची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागू शकेल. ईडीने आतापर्यंत याप्रकरणी ९,८९० कोटी रूपयांची संपत्ती जप्त केलेली आहे.

हे नवीन आरोपपत्र भारतीय स्टेट बँकेच्या तक्रारीवर आधारित आहे. मल्ल्या आणि त्याच्या कंपनीने २००५ ते १० या कालावधीत बँकेच्या समूहाकडून घेतलेल्या ६,०२७ कोटी रूपयांचे कर्ज फेडले नव्हते. यासंबंधी हे आरोपपत्र आहे. ईडीला तपासात कर्ज हेराफेरीसाठी बनावट कंपन्यांच्या समूहाचा उपयोग करण्यात आल्याचे दिसून आले. नवीन आरोपपत्रात याचाही उल्लेख असण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2018 4:48 pm

Web Title: enforcement directorate files charge sheet against vijay mallya for money laundering
Next Stories
1 ऑडीच्या सीईओंना जर्मनीत अटक
2 कार्यालयात किंवा घरात घुसून आंदोलन कसे करता? अरविंद केजरीवालांना हायकोर्टाने झापले
3 Video : काँग्रेस आमदार अल्पेश ठाकूरांनी कार्यक्रमात उधळल्या नोटा; सर्व स्तरातून टीका
Just Now!
X