News Flash

प्रवेश परीक्षेतून चीनचा इंग्रजीला डच्चू

चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे. तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तेथील विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेत विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील

| March 17, 2013 12:07 pm

चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे.
तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तेथील विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेत विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना गणित व भौतिकशास्त्र तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना गणित व चिनी भाषा हे विषय परीक्षेला असतील. त्सुंगहुआ विद्यापीठाचे प्रवेश अधिकारी यू हान यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी इंग्रजी काढून टाकण्यात आले आहे. विशिष्ट विषयात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे संधी मिळेल. त्सुंगुहुआ विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ व बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या तीन विद्यापीठांची प्रवेश परीक्षा ही राष्ट्रीय परीक्षेच्या तीन महिने अगोदर होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:07 pm

Web Title: english dropped from chinese university exams
Next Stories
1 इंडियन मुजाहिदीनच्या दोन आरोपींचा एनआयएकडे ताबा
2 मराठी जगत
3 सीआरपीएफ छावणीवरील आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी संशयिताला पकडले
Just Now!
X