* माझ्याकडे कोणीही राजीनामा मागितला नाही- एन.श्रीनिवासन यांचे स्पष्टीकरण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून सुरू असलेल्या विवादांना अनुसरून पत्रकार घेतली.  श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणावरून अटत केल्यानंतर, बीसीसीआयकडून मयप्पन यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे श्रीनिवासन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या समितीत अरुण जेटली, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, माजी क्रकेटपटू रवी शास्त्री, बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांचा समावेश आहे.
तसेच ‘मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, माझा फिक्सिंग आणि बुकींच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही’ असे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि कोणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही असे म्हणत श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.