News Flash

काश्मीरमध्ये शांतता कायम राखू

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केलेली शांतता आपले सरकार आणखी बळकट करेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या एकीकृत मुख्यालयांच्या पहिल्या

| March 13, 2015 01:09 am

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केलेली शांतता आपले सरकार आणखी बळकट करेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या एकीकृत मुख्यालयांच्या पहिल्या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री सईद यांनी उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांच्या सोबतीने लष्कर आणि गुप्तचर संस्थेचे अधिकारी यांच्यासह सुरक्षा संस्थांचे सादरीकरण पाहिले. यापूर्वी २१ जानेवारी रोजी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकीकृत मुख्यालयांच्या बैठकीनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती आणि दहशतवाद्यांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्न यांचा सईद यांनी आढावा घेतला. मुख्यालयांत सैन्य, निमलष्करी दले, पोलीस, तसेच केंद्रीय व राज्य गुप्तचर संस्थांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहे.लष्करी कमांडर्स त्यांचे सल्लागार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 1:09 am

Web Title: ensure surveillance of masarat alam
टॅग : Masarat Alam
Next Stories
1 राम माधव-मुफ्ती सईद यांची भेट
2 स्वाइन फ्लूचे देशभरात दीड हजार बळी
3 माहितीपट सरकार,बीबीसीमधील खासगी वाद
Just Now!
X