वरिष्ठ काँग्रेस नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार जयंती नटराजन यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नटराजन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडे या अतिरिक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. पक्षसंघटनेत काम करण्यासाठी जयंती नटराजन यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात येत आहेत. राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक टीम बनवत असून, यामध्ये जयंती नटराजन यांचा समावेश करण्यात आला आहे.