देशात २०१० पासून वाघांची संख्या वाढल्यानंर आता व्याघ्र संवर्धन प्रकल्पांच्या संख्येत वाढ करण्याचे कें द्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे आधी ४७ व्याघ्र प्रकल्प होते ते आता ५० होतील असे सांगण्यात आले.
पर्यावरण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, आम्ही वन्यजीव अभयारण्ये आणखी जैववैविध्यसक्षम केली जाणार आहेत. त्यात प्राणी, वनस्पती व पक्षी मोठय़ा प्रमाणात असतील. सध्या भारतात ४७ व्याघ्रप्रकल्प आहेत. आगामी काळात ही संख्या पन्नास पर्यंत वाढवली जाईल त्यामुळे वाघांचे संरक्षण होण्यास अधिक मदत होईल.
पर्यावरण मंत्रालयाने छत्तीसगडमधील गुरू घासिदास नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्प म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे. तो ४६ वा व्याघ्र प्रकल्प असेल. महाराष्ट्रातील बोर हा ४७ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला होता.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटक सरकारला कावेरी व एम.एम हिल्स वन्यजीव अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करावे असे कर्नाटक सरकारला सांगितले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या प्रस्तावाला आधीच हिरवा कंदिल दिला आहे.
अलीकडच्या व्याघ्र गणना अहवालात कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे ४०६ वाघ असल्याचे दिसून आले आहे.  कावेरी वन्यजीव अभयारण्याचा परिसर १०२.५९ चौरस किमीचा असून तो बंगलोर, म्हैसूर व मंडय़ा जिल्ह्य़ात पसरलेला आहे, माले मधेश्वरा संरक्षित जंगल आग्नेय कर्नाटकात आहे व ते तामिळनाडू हद्दीपर्यंत आहे. दरम्यान सरकारने नक्षलवादग्रस्त रेड कॉरिडॉरमध्ये म्हणजे देशाच्या पूर्व भागात असलेल्या पाच व्याघ्र संरक्षण प्रकल्पात वाघांना जास्त संरक्षण देण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर व श्रीशैलम येथील भाग, ओडिशातील सिमलीपल, छत्तीसगडमधील उदांती सितानदी व झारखंडमधील पलामू यांचा समावेश आहे. अलीकडच्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या २०१०च्या तुलनेत ३०.५ टक्के वाढल्याचे दिसून आले आहे.  सरकारने व्याघ्र संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांना यश येत असल्याचे पाहून सरकारने आता नवीन व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची घोषणा करण्याचे ठरवले आहे.

नवीन व्याघ्र प्रकल्प
सध्याची संख्या -४७
अपेक्षित संख्या ५०
गुरू घासिदास नॅशनल पार्क- छत्तीसगड
बोर व्याघ्र प्रकल्प- महाराष्ट्र
कावेरी व एम.एम हिल्स वन्यजीव अभयारण्य – कर्नाटक-नक्षलवादी परिसरातील व्याघ्र प्रकल्पांना संरक्षण

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण