22 April 2019

News Flash

पीएफचा व्याजदर ८.५५ टक्के कायम राहण्याची शक्यता

लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पीएफवर अधिक व्याज दिले जाण्याचीही शक्यता

इपीएफओ आपल्या सहा कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निधीवरील ८.५५ टक्के व्याज दर कायम ठेवण्याची शक्यता आहे.

इपीएफओ आपल्या सहा कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निधीवरील ८.५५ टक्के व्याज दर कायम ठेवण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्याज दरावरील प्रस्ताव २१ फेब्रुवारीला इपीएफओ विश्वस्तांच्या बैठकीत येईल. व्याज दर २०१७-१८ प्रमाणे ८.५५ टक्के कायम ठेवला जाईल. चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्न अनुमानाचा मुद्दाही बैठकीत ठेवला जाईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन जमा पीएफवर ८.५५ टक्क्यांहून अधिक व्याज दिले जाण्याची शक्यताही सूत्राने फेटाळलेली नाही.

श्रम मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील इपीएफओची मध्यवर्ती विश्वस्त समिती (सीबीटी)आर्थिक वर्षासाठी जमा पीएफवरील व्याजदर निश्चित करते. सीबीटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर खातेदाराच्या अकाऊंटमध्ये व्याज जमा केले जाते.

पाच वर्षांत सर्वांत कमी व्याज दर
२०१७-१८ मध्ये इपीएफओने खातेधारकांना ८.५५ टक्के व्याज दिले. जो पाच वर्षांतील सर्वांत कमी दर होता. २०१६-१७ मध्ये व्याज दर हा ८.६५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के होता. तर २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये कर्मचाऱ्यांना ८.७५ टक्के व्याज मिळाले होते. २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के व्याज देण्यात आले होते.

First Published on February 11, 2019 8:22 pm

Web Title: epfo may be retain interest rate at 8 55 percent for fy19 in feb 21 meeting