24 February 2021

News Flash

ESIC चा ग्राहकांना दिलासा; आपात्कालिन परिस्थितीत खासगी रुग्णालयांमध्येही उपचार करता येणार

ईएसआयसीनं घेतला मोठा निर्णय

एम्प्लोईज स्टेट इन्शोसन्स कॉर्पोरेशननं (ESIC) आपल्या सर्व ग्राहकांना दिलासा दिला आहे. ईएसआयसीनं त्यांचे सर्व ग्राहक आणि या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आपात्कालिन परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याला मंजुरी दिली आहे. यापूर्वी ईएसआयसीच्या ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या डिस्पेंन्सरी अथवा रुग्णालयात जावं लागत होतं. तसंच खासगी रुग्णालयात उपचारांसाठी रेफरल आणावं लागत होतं.

“मंडळाच्या बैठकीत आपात्कालिन परिस्थिती ईएसआयसी रुग्णालयात किंवा डिस्पेन्सरीमध्ये जाऊन रेफरल आणण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्ट सारख्या आपात्कालिन परिस्थितीत त्वरित रुग्णालयात दाखल करावं लागत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन कमिटीचे (TUCC) सचिव एस.पी. तिवारी यांनी दिली.

ईएसआयसीच्या ग्राहकांना आता आपात्कालिन आता इम्पॅनल्ड आणि नॉन इम्पॅनल्ड कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. यामध्ये केवळ एकच फरक असेल. इम्पॅनल्ड रुग्णालयांमधअये कॅशलेस उपचार केले जाणार आहेत. तर नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात सरकारी दरानुसार पैसे रिअँबर्स करण्यात येतील. दरम्यान, नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात तेव्हाच उपचार करता येतील जेव्हा रुग्णाच्या १० किलोमीटर नजीकच्या परिसरात कोणतंही ईएसआयसी अथवा इम्पॅनल्ड रुग्णालयं नसतील. ईएसआयसी आता ज्या रुग्णालयांद्वारे आरोग्य सेवा पुरवणार आहे ते स्वत: चालवले जाणार आहेत. त्यांची जबाबदारी राज्यांकडे सोपवण्यात येणार नसल्याचंही तिवारी यांनी सांगितलं.

आरोग्य सेवांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ईएसआयसीच्या २६ रुग्णालयांच्या उभारणीचं काम पूर्ण झालं आहे. तर १६ रुग्णालयांच्या उभारणीचा आराखडा तयार आहे. सध्या राज्य ईएसआयसीचे ११० रुग्णालयं चालवतात. यासाठी ईएसआयसीकडून सेवा शुल्कही दिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 2:33 pm

Web Title: esic relaxed norms for availing health services in private hospitals in emergency cases no need of referral private hospital jud 87
Next Stories
1 शेतकरी आंदोलन : १२ दिवसांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू
2 भारत बंदचा ‘या’ परीक्षांना बसला फटका; नवीन तारीख जाहीर
3 “अरविंद केजरीवालांना गहू आणि तांदूळ यातील फरक कळतो का?”
Just Now!
X