News Flash

हेरगिरी प्रकरणी लष्करातील हवालदाराला अटक

रविवारी फरीद खान या आणखी एका लष्करी हवालदाराला सिलिगुडी येथून अटक करण्यात आली.

| December 7, 2015 05:26 am

समरप्रसंगी अथवा युद्धजन्य परिस्थितीत भारतीय लष्कराच्या तुकडय़ांचा ठावठिकाणा कुठे असेल, या माहितीचा समावेश असलेली गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी हेरसंस्था आयएसआयच्या हस्तकाला दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी लष्कराच्या हवालदाराला सिलिगुडी येथून अटक केली. लष्करी हेरगिरी प्रकरणात झालेली ही पाचवी अटक आहे.
भारतीय लष्कराच्या हालचाली, महत्त्वाच्या ठाण्यांचे नकाशे आदींचा तपशील असलेली कागदपत्रे कफैतुल्ला खान या आयएसआय हस्तकाला पुरवल्याचे प्रकरण २६ नोव्हेंबरला उघडकीस आले होते.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कफैतुल्ला खान याच्यासह सीमा सुरक्षा दलाचा एक जवान, एक शिक्षक व लष्कराचा एक हवालदार अशा चौघांना अटक केली होती. रविवारी फरीद खान या आणखी एका लष्करी हवालदाराला सिलिगुडी येथून अटक करण्यात आली. त्याला आज, सोमवारी दिल्लीत आणण्यात येणार आहे.
कफैतुल्ला खान यानेच या सर्वाना फितवले होते. त्याच्या चौकशीतूनच फरीदचे नाव पुढे आले. कफैतुल्लाकडील ध्वनिफितीचा तपास केला असता त्यात फरीदचा उल्लेख ‘सर्जन’ असा करण्यात येत होता.
समरप्रसंगी अथवा युद्धजन्य परिस्थितीत भारतीय लष्कराच्या तुकडय़ांचा ठावठिकाणा कुठे असेल, याची माहिती फरीदने कफैतुल्लाला पुरवली होती.
फरीदच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांचे पथक रविवारी सिलिगुडी येथे गेले. लष्कराच्या ताब्यातून फरीदला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 5:26 am

Web Title: espionage case delhi police arrests armyman in alleged isi linked racket
Next Stories
1 पॅरिस हवामान बैठक अपयशी होऊ देणार नाही
2 पॅरिसचे हवाभान, फ्रेंच जीवनभाष्ये..
3 सर्वसमावेशक व संपन्नतेचे आंबेडकरांचे स्वप्न साकारू
Just Now!
X