27 October 2020

News Flash

ब्रेग्झिट विधेयकावरून ‘ईयू’ची ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई

युरोपीय समुदायाने केलेल्या या कारवाईमुळे ब्रिटनसमवेत असलेले संबंध अधिकाधिक बिघडले असल्याचे अधोरेखित झाले आ

(संग्रहित छायाचित्र)

 

ब्रेग्झिट करारामधील काही तरतुदींचा भंग करणारा कायदा मंजूर करण्याची योजना आखल्याबद्दल युरोपीय समुदायाने (ईयू) गुरुवारी ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

युरोपीय समुदायाने केलेल्या या कारवाईमुळे ब्रिटनसमवेत असलेले संबंध अधिकाधिक बिघडले असल्याचे अधोरेखित झाले आहे. नव्या कायद्याबाबतचे विधेयक मागे घेण्यासाठी युरोपीय समुदायाने ब्रिटनला बुधवापर्यंतची मुदत दिली होती. मात्र ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींनी कायदा करण्याचा प्रस्ताव ३४० विरुद्ध २५६ मताधिक्याने रेटून नेला.

या वर्षांअखेपर्यंत दोन्ही बाजूंचा प्राथमिक स्वरूपाचा मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न असला तरी ब्रिटनच्या अंतर्गत बाजारपेठ विधेयकावरून या महिन्यात दोन्ही बाजूंमधील संबंध बिघडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:36 am

Web Title: eu legal action against britain over brexit bill abn 97
Next Stories
1 कारखान्यांबाबत गुजरातच्या अधिसूचना रद्द
2 बलात्कार झालाच नाही!
3 अमेरिकेत निर्वासितांचा लोंढा कमी करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव
Just Now!
X