News Flash

लस घेतल्यानंतरही अनेकांना करोनाची बाधा

मात्र प्रमाण अत्यल्प असल्याचा ‘आयसीएमआर’चा दावा

(संग्रहित छायाचित्र)

कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशींची पहिली मात्रा घेतल्यानंतर २१ हजारांहून अधिक लोक करोना पॉझिटिव्ह ठरले असून; दुसरी मात्रा घेतल्यानंतर ५५०० हून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली. मात्र एकूण लसीकरणाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केला आहे.

ज्या १७,३७,१७८ लोकांना कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा देण्यात आली त्यांच्यापैकी ०.०४ टक्के लोकांना; तर कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेतलेल्या १,५७,३२,७५४ लोकांपैकी ०.०३ टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला, असेे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.

लशी संसर्गाचा धोका कमी करतात आणि संभाव्य मृत्यू व तीव्र स्वरूपाचा संसर्ग यांना प्रतिबंध करतात, असे याबाबतची आकडेवारी देताना भार्गव म्हणाले. लसीकरणानंतर एखाद्याला संसर्ग झाला, तर त्याला ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ म्हणतात, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत कोव्हॅक्सिनच्या १.१ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी ९३ लाख लोकांना पहिली मात्र देण्यात आली व त्यापैकी ४२०८ (०.०४ टक्के) लोकांना संसर्ग झाला. हे प्रमाण १० हजार लोकांमागे ४ असे आहे. सुमारे १७,३७,१७८ लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली व त्यापैकी फक्त ६९५ (०.०४ टक्के) लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

कोव्हिशिल्डच्या ११.६ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. १० कोटी लोकांना पहिली मात्र देण्यात आली व त्यापैकी १७१४५, म्हणजे १० हजारामागे २ लोकांना लोकांना संसर्ग झाला. १,५७,३२,७५४ लोकांनी या लशीची दुसरी मात्रा घेतली व त्यापैकी ५०१४ (०.०३ टक्के) लोक करोनाबाधित झाले. अशा प्रकारे १० हजारांमागे २ ते ४ लोकांमध्ये ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ घडून आले आहे व हा आकडा फारच कमी आहे. यापैकी बहुतांश लोक प्रामुख्याने व्यवयासाच्या स्वरूपामुळे धोका असलेले आरोग्य कर्मचारी होते, असे भार्गव यांनी सांगितले.

या आकडेवारीनुसार, दोन्हीपैकी कुठल्याही एका लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ५७०९ लोकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:32 am

Web Title: even after vaccination many suffer from corona abn 97
Next Stories
1 खासगी रुग्णालयांची १ मेपासून कंपन्यांकडून थेट लस खरेदी
2 टाळेबंदीच्या भीतीमुळे हजारो मजुरांचे स्थलांतर
3 बंगालच्या भूमीतून : जागा वाढतील, पण भाजपला सत्ता मिळेल?
Just Now!
X