News Flash

मुस्लीम मुलगी अल्पवयीन असली तरी तिचा निकाह वैध – हायकोर्ट

कोर्टाने 'मुस्लिम पर्सनल लॉ'चा दिला संदर्भ

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि फाइल फोटो)

मुस्लिम मुलगी अल्पवयीन असली तरी देखील तिचा निकाह वैध आहे, असं पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं म्हटलं आहे. प्रेमविवाह केलेल्या एका मुस्लिम दाम्पत्याच्या सुरक्षेशी संबंधीत याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ही टिपण्णी केली आहे. हे दाम्पत्य पंजाबच्या मोहाली येथील रहिवासी आहे.

मुस्लिम पर्सनल लॉचा संदर्भ देताना हायकोर्टानं म्हटलं की, जर मुस्लिम मुलगी अल्पवयीन असेल तर तिचा विवाह वैध आहे. मोहाली येथील या जोडप्याने हायकोर्टात याचिका दाखल करत त्यात म्हटलं होतं की, त्यांनी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन निकाह केला आहे. या निकाहमुळे दोन्हीकडचे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळे या दाम्पत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यातील तरुणाचं वय ३६ वर्षे आहे तर मुलीचं वय १७ वर्षे आहे. मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलं की, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला आमच्याकडे सोपवण्यात यावं.

दरम्यान याचिकाकर्त्या दाम्पत्यानं म्हटलं की, त्यांनी जानेवारी महिन्यांत निकाह केला होता तेव्हापासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. निकाहनंतर सुरक्षेसाठी मोहालीच्या पोलीस अधीक्षकांकडेही त्यांनी मदत मागितली होती. मात्र, तिथून सुरक्षेबाबत कुठलीही पावलं उचलली गेली नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत टाळाटाळ केल्यानेच या दाम्पत्याला हायकोर्टात धाव घ्यावी लागली.

या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं म्हटलं की, “मुस्लीम प्रेमविवाहासंदर्भात मुलीनं प्रौढ असणं गरजेचं नाही. जर मुलगी समजदार आहे, म्हणून तिला आपला जोडीदार निवडायचा अधिकार आहे. संविधानानेच तिला स्वतंत्ररित्या आणि आवडता जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्याचबरोबर हायकोर्टाने मोहालीच्या पोलीस अधीक्षकांना आदेश दिला की, त्यांनी या मुस्लिम दाम्पत्याच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांना सुरक्षा प्रदान करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 4:29 pm

Web Title: even if a muslim girl is a minor her marriage is valid says high court aau 85
Next Stories
1 काँग्रेससारखा गोंधळलेला पक्ष देशाचं भलं करु शकत नाही – नरेंद्र मोदी
2 रावणाच्या श्रीलंकेत प्रभू रामाच्या भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त का?; मोदी सरकारने दिलं उत्तर
3 नाना पटोले व उदयनराजेंची सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Just Now!
X