News Flash

धक्कादायक! ‘दर चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यासाठी पकडला जातो’

आरबीआयने दिलेल्या माहितीतील वास्तव

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आपल्या देशात सध्या पीएनबी बँकेचा घोटाळा चांगलाच गाजतो आहे. नीरव मोदीने या बँकेला ११ हजार कोटींना चुना लावल्याची बातमी समोर येत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफरातफर, घोटाळा किंवा फसवणुकीसाठी दर चार तासाला एक बँक कर्मचारी पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते ही माहिती रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या एका डेटानुसार समोर आली आहे. १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पब्लिक सेक्टरमधील बँकांच्या ५ हजार २०० कर्मचाऱ्यांना फसवणूक, घोटाळा, अफरातफर प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आरबीआय च्या डेटानुसार अफरातफरीच्या किंवा घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना दंड आकारला गेला आणि त्यांना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आले. सध्या आरबीआय एप्रिल २०१७ ते आत्तापर्यंत किती लोकांना अफरातफर किंवा घोटाळा प्रकरणी शिक्षा झाली याची माहिती गोळा करते आहे. सर्वाधिक फ्रॉड करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एसबीआयचे कर्मचारी पहिल्या क्रमांकावर आहेत. एसबीआयच्या १ हजार ५३८ कर्मचाऱ्यांवर घोटाळा किंवा अफरातफर प्रकरणात कारवाई झाली आहे.

एसबीआय पाठोपाठ इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल ऑफ बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा क्रमांक लागतो. मात्र या बँकांच्या तुलनेत एसबीआयमध्ये घोटाळा केलेल्या कर्मचाऱ्यांचे तिप्पट आहे. या कर्मचाऱ्यांमुळे बँकांचे किती नुकसान झाले याची माहिती आरबीआयने अद्याप दिलेली नाही. आरबीआयच्या जुन्या डेटा प्रमाणे १ एप्रिल २०१३ ते ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत सगळ्या बँकांमध्ये १७०४ फ्रॉड केसेस समोर आल्या. या प्रकरणांमुळे एकूण ६६ हजार कोटींचे नुकसान झाले. मात्र नव्या डेटानुसार आर्थिक नुकसान किती झाले हे अद्याप आरबीआयने जाहीर केलेले नाही.

पीएनबी घोटाळ्यामुळे ११ हजार कोटींचा चुना एकट्या नीरव मोदीमुळे लागल्याचे समोर आले. अशात आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार एसबीआय या बँकेतील कर्मचारी घोटाळा, अफरातफर करण्यात अग्रेसर आहेत. त्यांचे प्रमाणच जर मोठे असेल आणि इतर बँकांमध्येही असेच कर्मचारी असतील तर झालेले नुकसान हे काही हजार कोटींच्या घरात असणार असे समजायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 9:51 am

Web Title: every 4 hours 1 bank staffer held for fraud
Next Stories
1 रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी ५ बँकांचे ५०० कोटी बुडवून पसार
2 ‘पीएनबी’ घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप
3 साहित्यिकांची संमेलनाकडे पाठ!
Just Now!
X