News Flash

वजन घटवायचे आहे? रोज सायकल चालवा!

रोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर, सायकल चालवणे यामुळे वजन कमी करता येते पण त्यासाठी मनाचा पक्का निर्धार हवा असे मत एका अभ्यासाअंती व्यक्त करण्यात आले आहे.

| May 12, 2015 12:11 pm

वजन घटवायचे आहे? रोज सायकल चालवा!

रोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर, सायकल चालवणे यामुळे वजन कमी करता येते पण त्यासाठी मनाचा पक्का निर्धार हवा असे मत एका अभ्यासाअंती व्यक्त करण्यात आले आहे. इस्ट एंडिलिया विद्यापीठातील सेंटर फॉर डायट अँड अ‍ॅक्टीव्हिटी रीसर्च या केंद्रातील संशोधकांनी म्हटले आहे की,सायकलवर कामावर जाणे नेहमी फायद्याचे ठरते, मानसिक आरोग्यही त्यामुळे सुधारते.
 कामावर दुचाकी किंवा चार चाकी गाडीने जाण्यापेक्षा सायकलवर व कामाचे ठिकाण जवळ असेल तर चालत जावे. शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, त्यामुळे दोन वर्षांत बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी होतो. या अभ्यासातून नागरिकांनी रोजच्या व्यवहारात शारीरिक हालचाल होणाऱ्या व्यायामांचा समावेश केला तर वजन कमी होऊ शकते हे दाखवून देण्यात आले आहे, असे संशोधक अ‍ॅडम मार्टिन यांनी सांगितले. २००४-२००७ दरम्यान ब्रिटन हाऊसहोल्ड सव्‍‌र्हे या उपक्रमात ४००० प्रौढ व्यक्तींकडून प्रतिसाद मागवण्यात आले होते. त्यांनी कामावर कशा पद्धतीने जातात, त्यांचे वय व उंची या बाबींची माहिती दिली होती, तीन वर्षांत त्यांनी सायकलिंग व चालत कामावर जाण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचे वजन तीन वर्षांत कमी झालेले दिसले. लोक कामावर जाताना कुठल्या मार्गाचा अवलंब करतात व त्यांचे वजन किती यांचा संबंध असल्याचे दिसून आले. मोटार किंवा दुचाकी वाहन चालवणे सोडून सायकलिंग सुरू केले असता बीएमआय ०.३२ ने कमी झाल्याचे दिसून आले. साधारण व्यक्तीत बीएमआयमध्ये एवढा फरक पडणे म्हणजे वजन एक किलोने कमी होण्याच्या बरोबर आहे. जे लोक तीस मिनिटे सायकलने किंवा पायी प्रवास करतात त्यांच्यात बीएमआय २.२५ ने कमी होतो म्हणजे वजन ७ किलोने कमी होते, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. संशोधकांच्या मते मोटारने कामावर गेल्यास, बीएमआय ०.३४ अंकांनी वाढतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2015 12:11 pm

Web Title: everyday cycling make weight lose
टॅग : Cycling
Next Stories
1 भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत
2 बलात्कार, लैंगिक छळवणुकीच्या खटल्यात असांजचे अपील फेटाळले
3 युपीएच्या जमीन अधिग्रहण कायद्यास पाठिंबा ही चूकच
Just Now!
X