न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सकाळी साडेनऊ वाजता शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्यानंतर न्या. शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आहे आहे. गोगोई यांनी बोबडे यांची नियुक्त करण्याचे शिफारसपत्रविधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले होते. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचा नागपूरमधून सुरु झालेला प्रवास सरन्यायाधीश पदापर्यंत पोहचला आहे. याच प्रवासावर टाकलेली नजर.

  • न्या. बोबडे हे नागपूरचेच आहेत.
  • त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ ला नागपुरात झाला.
  • बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.
  • न्या. शरद बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपुरातच झाले.
  • त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी संपादन केली. त्यानंतर नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली.
  • १९९८ साली त्यांना वरिष्ठ अधिवक्तापद बहाल करण्यात आले.
  • २००० ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आले.
  • त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ ला ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले.
  • १२ एप्रिल २०१३ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांचाही शपथविधी पार पडला होता.
  • मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले न्या. बोबडे यांची २०१२ रोजी ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
  • २०१६ साली नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे) कुलपती म्हणून नियुक्त केले. नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे बोबडे हे नागपुरातील राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती झाले.

  • भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. सरन्यायाधीश म्हणून कारकीर्द १७ महिन्यांची असेल. सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ ला निवृत्त होणार आहेत.