News Flash

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे निधन

रसिद्द अर्थतज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे बुधवारी रात्री उशिरा अलहाबाद येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. 'लंडन स्कूल इकॉनॉमिक्स'मधून पदवी घेतलेले

| September 4, 2014 12:42 pm

प्रसिद्द अर्थतज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे बुधवारी रात्री उशिरा अलहाबाद येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ‘लंडन स्कूल इकॉनॉमिक्स’मधून पदवी घेतलेले मोहम्मद फजल यांची भारतातील आघाडीचे अर्थतज्ञ म्हणून ख्याती होती. भारतीय नियोजन आयोगाचे ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे पाहिले जात होते. मोहम्मद फजल यांनी १९९९ ते २००२ या कार्यकाळात गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला होता. त्यानंतर ऑक्टोबर २००२ ते डिसेंबर २००४ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद भुषविले होते. फजल यांची सर्वप्रथम १९७७ मध्ये औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते १९८० ते ८५ या काळात नियोजन आयोगाचे सदस्य होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 12:42 pm

Web Title: ex goa maharashtra governor mohammed fazal dead
टॅग : Loksatta
Next Stories
1 ज्यांच्याविरुद्ध तपास सुरू तेच सीबीआय संचालकांच्या भेटीला; अभ्यागत नोंदींवरून स्पष्ट
2 जपानमध्ये जाऊन ड्रम वाजविण्यापेक्षा देशातील समस्यांकडे लक्ष द्या- राहुल गांधी
3 गंगा २०० वर्षांत तरी शुद्ध होईल का?
Just Now!
X