नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी आपल्या प्रचारात अनेक अवाजवी आश्वासनं दिली. मोठमोठी स्वप्नं दाखवली. पण ही स्वप्नं वास्तवात कधीच पूर्ण होणारी नव्हती, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. ते काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनात बोलत होते. देशातील युवकांसाठी दोन कोटी रोजगार निर्माण करणार असल्याचे सांगितले. पण अजून दोन लाख जणांनाही नोकरी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदींची निवडणूकपूर्व आश्वासने ही केवळ नाटकबाजी – सोनिया गांधी

महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी व भाजपाच्या धोरणांवर टीका केली. मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळला. यापूर्वी कधीही नव्हते इतके खराब वातावरण सध्या या राज्यात आहे. दिवसेंदिवस येथील परिस्थिती चिघळत चालली आहे. आपल्या सीमा असुरक्षित राहिल्या आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद आणि अंतर्गत हिंसाचारामुळे परिस्थिती वाईट झाल्याचे ते म्हणाले.

देशातील वातावरण निराशाजनक

त्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी देशातील युवकांना दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण दोन लाख जणांनाही अद्याप रोजगार मिळालेला नाही. निवडणूक प्रचारावेळी खोटी आश्वासने दिल्याचा आरोप त्यांनी केला.

तत्पूर्वी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. मोदी सरकारने भारताचे परराष्ट्र धोरणच बिघडवून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. मागील चार वर्षांत त्यांनी फसवे धोरण अवलंबले. आज अशी परिस्थिती आहे की, अनेक महत्वाच्या राजधान्यांशी आपण व्यवस्थित संबंध ठेवले नसल्याची टीकाही त्यांनी केली.