उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेले निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे नवे सीईओ बनले आहेत. पालो अल्टो नेटवर्क सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे. यासोबतच जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचं नाव दाखल झालं आहे.

पालो अल्टोकडून अरोरा यांना १२.८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८५९ कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, निकेश यांच्या आधी अॅपलचे सीईओ टीम कुक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळवणारे सीईओ होते. त्यांचं वर्षाचं पॅकेज ११९ मिलियन डॉलरचं आहे.

निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे नवे सीईओ बनले आहेत. पालो अल्टो नेटवर्क सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे. पालो अल्टोकडून अरोरा यांना १२.८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८५९ कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, निकेश यांच्या आधी अॅपलचे सीईओ टीम कुक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळवणारे सीईओ होते. त्यांचं वर्षाचं पॅकेज ११९ मिलियन डॉलरचं आहे.

टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये अरोरा यांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यापूर्वी ते सॉफ्ट बॅंक आणि गुगलमध्ये कार्यरत होते. पालो अल्टोमध्ये अरोरा यांनी मार्क मिकलॉकलीन यांची जागा घेतली आहे. मार्क २०११ पासून या आठवड्यापर्यंत पालो अल्टोचे सीईओ होते. मार्क मिकलॉकलीन हे कंपनीमध्ये मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत, तर अरोरा हे बोर्डाचे अध्यक्षही असतील. ६ जून रोजी अरोरा हे पदभार सांभाळणार आहेत.

कंपनीकडून अरोरांना 268 कोटींचे रिस्ट्रिक्टेड शेअरही मिळतील अशी माहिती आहे. मात्र, हे शेअर ते सात वर्षांपर्यंत विक्री करु शकत नाहीत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, निकेश अरोरांना देण्यात आलेले पालो अल्टो नेटवर्कचे शेअर पुढल्या 150 टक्के वाढल्यास, त्यांना 442 कोटी रुपये मिळतील. एवढंच नव्हे, तर अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे 134 कोटींपर्यंत शेअर खरेदी करु शकतात.

6 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे निकेश अरोरा यांचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. दिल्लीतील हवाईदलाच्या शाळेतच अरोरा यांचं शिक्षण झालं. त्यानंतर 1989 साली आयआयटी वाराणसीमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर विप्रोमध्ये त्यांना नोकरी लागली. पण पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टनमध्ये जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नंतर अमेरिका नॉर्थ-ईस्टर्न यूनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.

निकेश यांना एवढं पॅकेज मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  पण, सध्या सायबर सिक्युरीटी डेटा अॅनलिसिसमध्ये वाईट गुंतलेली आहे आणि निकेश यांच्याकडे क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा फार मोठा अनुभव आहे, त्यामुळेच त्यांना एवढं पॅकेज मिळाल्याचीही चर्चा आहे.