22 September 2020

News Flash

तब्बल ३०० कोटींचा निजामाचा महाल विकला परस्पर

मुंबईतील एका बांधकाम कंपनीतील दोन माजी कर्मचाऱ्यांचा प्रताप

हैदराबादेतील निजामाच्या तब्बल ३०० कोटी रुपये किंमतीच्या एका महालाची मुंबईतील एका बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या हैदरगुडामध्ये हा महाल किंग कोठीच्या नावाने प्रसिद्ध आहे.

या दोन कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या एका हॉटेल व्यावसायिकाला या महालाची परस्पर विक्री करत, कंपनीला चुना लावला आहे. विशेष म्हणजे या महालाची विक्री करून या कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी कंपनीकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईतील निहारिका इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने याप्रकरणी त्यांचे माजी कर्मचारी सुरेश कुमार आणि सी रविंद्र यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या दोघांनी कंपनीला फसवूण हा व्यवहार केल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपनीने ही साधारण १०० वर्षे जुनी मालमत्ता तीन वर्षांपूर्वी नजरी बाग पॅलेस ट्रस्टकडून खरेदी केली होती. मात्र कंपनीचे कर्मचारी जेव्हा हैदराबादच्या रजिस्ट्रार कार्यालयात गेले तेव्हा त्यांना या पॅलेसची विक्री झाली असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती. शिवाय आता या महालाची मालकी आयरिस हॉस्पिटॅलिटीकडे असल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कंपनीने चौकशी केली असता सुरेश कुमार व सी रविंद्र या माजी कर्मचाऱ्यांचा हा प्रताप असल्याचे निर्दशनास आले. या दोघांनी या महालाची विक्री करून फेब्रवारीतच कंपनीचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा व्यवहार केला गेला असल्याची पोलिसांकडून शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:48 pm

Web Title: ex staffers sell rs 300 cr nizam palace behind comapnay msr 87
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 मोदींविरोधात बोलल्यास गजाआड करण्याचे धोरण
Just Now!
X