अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशाचे सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी कर वसुलीसंबंधी महत्वपूर्ण विधान केलं आहे. सरकारकडून जनतेवर मनमानी पद्धतीने कर आकारणी होत असेल तर, तो सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. कर चोरी हा सुद्धा एक गुन्हा असून तो, दुसऱ्याबरोबर झालेला अन्याय आहे असे सरन्यायाधीश म्हणाले.

इन्कम टॅक्स अपीलेट ट्रायब्युनलच्या ७९ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कर वसुली कशी करावी हे सांगताना त्यांनी मधमाशांचे उदहारण दिले.

मधमाशा ज्याप्रमाणे फुलाचे नुकसान केल्याशिवाय रस काढतात, कर वसुली सुद्धा मधासारखी असली पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन येत्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या सरन्यायाधीशांचे हे विधान महत्वपूर्ण आहे.