21 September 2020

News Flash

भारत-पाकिस्तान यांच्यात नागरी कैद्यांच्या याद्यांची देवाणघेवाण

नागरी कैद्यांबरोबरच एकमेकांच्या ताब्यातील मच्छिमांराचाही समावेश

(संग्रहित छायाचित्र)

 

भारत व पाकिस्तान यांच्यात नागरी कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे करण्यात आली. त्या यादीत नागरी कैद्यांबरोबरच एकमेकांच्या ताब्यातील मच्छिमांराचाही समावेश असतो. दोन्ही देशांनी एकमेकांना अशी कैद्यांची यादी देण्याचा करार २००८ मध्ये झाला होता.

भारताच्या ताब्यात पाकिस्तानचे २६५ नागरी कैदी असून इतर ९५ मच्छिमारांची यादी पाकिस्तानला देण्यात आली. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले ५४ नागरी कैदी व २७० मच्छिमार यांची यादी भारताला दिली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.  भारत सरकारने नागरी कैद्यांना लवकरात लवकर सोडून देण्याची मागणी केली असून बेपत्ता भारतीय संरक्षण अधिकारी, मच्छिमार, त्यांच्या बोटी सोडून द्याव्यात असेही भारताचे म्हणणे आहे. पाकिस्तानने ७ भारतीय नागरिकांना व १०६ मच्छिमारांना  त्यांच्या ताब्यातून सोडून द्यावे. भारतीय मच्छिमार, १८ भारतीय नागरी कैदी यांना दूतावास संपर्क करून द्यावा असेही भारताने म्हटले आहे.

मानसिक रुग्ण असलेल्या भारतीय कैद्यांच्या तपासणीसाठी आमच्या डॉक्टरांच्या पथकाला पाकिस्तानात प्रवेश द्यावा असे अनेक कैदी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत असेही सांगण्यात आले. मच्छिमार बोटी परत मिळण्यासाठी चार सदस्यांच्या पथकास कराचीत प्रवेश द्यावा असेही भारताचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:10 am

Web Title: exchange of lists of civilian prisoners between india and pakistan abn 97
Next Stories
1 २४ तासांमध्ये देशभरात १८,६५३ रुग्णांची वाढ
2 ‘कोरोनिल’च्या विक्रीवर निर्बंध नाही – पतंजली
3 ‘लालबागचा राजा’ मंडळाचं पी. चिदंबरम यांनी केलं अभिनंदन; म्हणाले…
Just Now!
X