News Flash

सत्ताधाऱ्यांकडेच कल

मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज : पश्चिम बंगाल ममतांकडेच

(संग्रहित छायाचित्र)

मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज : पश्चिम बंगाल ममतांकडेच, आसाममध्ये सोनोवाल, तमिळनाडूत मात्र सत्तापालटाचे संकेत

पश्चिम बंगालमधील आठव्या टप्प्यातील मतदान संपताच विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या कलानुसार आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरेल, तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज आहे. केरळमध्ये डावे सत्ता राखतील, तर तमिळनाडूत मात्र सत्तांतराचा अंदाज आहे.

सर्वच मतदानोत्तर मतचाचण्यांनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर येईल, तर आसाममध्ये सत्ताधारी भाजप सत्ता कायम राखील, असा अंदाज आहे.

तमिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके आघाडीला सत्तेवरून खाली खेचून डीएमके आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज मतदोनात्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला धक्का बसण्याची शक्यता काही चाचण्यांतील आकडे दर्शवतात.

पश्चिाम बंगालमध्ये २९४ जागांपैकी भाजपप्रणित आघाडीला १३८-१४८, तर तृणमूल काँग्रेसला १२८-१३८ जागा मिळतील, असा रिपब्लिक-सीएनएक्सचा अंदाज आहे. टाईम्स नाऊ-सी व्होटरच्या अंदाजानुसार तृणमूल १६२ जागा जिंकेल आणि भाजपला ११५ जागा मिळतील.

आसामध्ये १२६ जागांपैकी ७५-८५ जागा जिंकून भाजप तेथे पुन्हा सत्तेवर येईल आणि काँग्रेस ४०-५० जिंकेल, असा इंडिया टुडेच्या चाचण्यांमधील अंदाज आहे.

देशभर करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदान घेण्यात आले. प्रामुख्याने माल्दा, मुर्शिदाबाद, बिरभूम आणि उत्तर कोलकाता या जिल्ह््यांमध्ये पसरलेल्या ३५ विधानसभा मतदारसंघांच्या निकालावर तेथील सत्तेची गणिते मांडली जातात. बंगालमधील मतदान आठ, तर आसाममधील मतदान तीन टप्प्यांत घेण्यात आले.

सर्व नजरा बंगालकडे…

विधानसभेच्या २९४ जागा असलेल्या पश्चिम बंगालच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तेथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष – काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आघाडीचे आव्हानही तृणमूल आणि भाजपपुढे होते.

बंगालमध्ये ७६.०७ टक्के मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अखेरच्या टप्प्यात गुरुवारी ७६.०७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

चाचण्यांचे अंदाज

पश्चिम बंगाल   एकूण जागा : २९४, बहुमतासाठी : १४८

* एबीपी सी-व्होटर   तृणमूल : १५२-१६४, भाजप : १०९-१२१, काँग्रेस- डावेपक्ष : १४-२५

* इटीजी रिसर्च तृणमूल : १६४-१७६, भाजप : १०५-११५, काँग्रेस- डावेपक्ष : १०-१५

* पी- एमएआरक्यू   तृणमूल : १५२-१७२, भाजप : ११२-१३२, काँग्रेस- डावेपक्ष : १०-२०

* सीएनएन न्यूज१८  तृणमूल : १६२, भाजप : ११५, काँग्रेस- डावेपक्ष : १५

* रिपब्लिक – सीएनएक्स तृणमूल : १२८-१३८, भाजप : १३८- १४८, काँग्रेस- डावेपक्ष : ११-२१

* टाइम्स नाऊ तृणमूल काँग्रेस : १५८, भाजप : ११५, काँग्रेस-डावेपक्ष आणि इतर १९ अधिक २

आसाम  एकूण जागा : १२६, बहुमतासाठी : ६४

* एबीपी-सी व्होटर   एनडीए : ५८-७१,  काँग्रेस आघाडी : ५३-६६,  इतर : ०-५

* पी- एमएआरक्यू   एनडीए : ६२-७०,  काँग्रेस आघाडी : ५६-६४,  इतर : ०-४

* इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस    एनडीए : ७५-८५,  काँग्रेस आघाडी : ४०-५०,  इतर : १-४

माय इंडिया

* रिपब्लिक -सीएनएक्स एनडीए : ७४-८४, काँग्रेस आघाडी : ४०-५०, इतर : १-३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:59 am

Web Title: exit poll west bengal tamil nadu in kerala in assam abn 97
Next Stories
1 महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायू, दिल्लीला कमी का?
2 पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या किरकोळ घटना
3 फेसबुकवरील ‘रिझाइन मोदी’ हॅशटॅग रोखले
Just Now!
X