22 September 2020

News Flash

अबब! चार टायरची किंमत चार कोटी रुपये

टायरची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झालीये

संग्रहित छायाचित्र

मोटारीला वापरण्यात येणाऱ्या टायरची किंमत अशी किती असू शकते, असा प्रश्न कोणाला विचारला तर तो काही हजारांमध्ये असेल असे सांगू शकतो. पण याच टायरची किंमत कोटींच्या घरात असेल, असे तुम्हाला सांगितले, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका व्यवहारात एका ग्राहकाने तब्बल ४ कोटी रुपयांना चार टायर विकत घेतले. विशेष म्हणजे हे टायर विकत घेणारी व्यक्ती भारतीयच आहे. या टायरची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालीये, असे टायर उत्पादक कंपनीने म्हटले आहे.
काय आहे या टायरचे वेगळेपण
हे सर्व टायर २४ कॅरेट सोन्याने सजविण्यात आले आहेत.
या टायरवरती खास निवडून आणलेले काही हिरेही लावण्यात आले आहेत.
टायर उत्पादन क्षेत्रातील जेड टायर या कंपनीने या खास टायरची निर्मित केली आहे. या टायरचे डिझाईन दुबईमध्येच तयार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला सोनारांकडून सजविण्यात आले. दुबईमधील रायफेन प्रदर्शनात हे टायर्स ४ कोटी रुपयांना विकले गेले. या टायरच्य विक्रीतून मिळणारी रक्कम एका फाऊंडेशनला देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2016 3:50 pm

Web Title: expensive car tyres sold on rs 4 crore
Next Stories
1 लढाऊ विमानाच्या एका हेल्मेटची किंमत फक्त चार लाख डॉलर्स!
2 केस चोरीप्रकरणी तिघांना अटक
3 Ishrat Jahan : इशरत जहाँ प्रकरणात तपास प्रमुखांची ‘अशी ही बनवाबनवी’ उघड
Just Now!
X