News Flash

‘जैश’वरील हल्ल्याची कारणे आंतरराष्ट्रीय समुदायाला द्या

संसदीय समितीची परराष्ट्र मंत्रालयास सूचना

| March 2, 2019 02:28 am

परराष्ट्र सचिव विजय गोखले

संसदीय समितीची परराष्ट्र मंत्रालयास सूचना

नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर भारताने हवाई हल्ले का केले त्यामागील कारणांची तपशीलवार माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यावी, अशी सूचना संसदीय समितीने शुक्रवारी सरकारला केली.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परराष्ट्र मंत्रालय संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताज्या घडामोडींची माहिती दिली त्या वेळी समितीने वरील सूचना केली.

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण अड्डय़ांवर भारताने केलेला हवाई हल्ला आणि पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर देण्याचा केलेला प्रयत्न, याबाबत गोखले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय लष्करी ठाण्यांवर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला, त्यामध्ये एका विमान पडले, असेही गोखले यांनी समितीला सांगितले. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर भारताने हवाई हल्ला का केला त्यामागील कारणांची तपशीलवार माहिती सरकारने जगाला सांगावी, असे समितीमधील सदस्यांनी परराष्ट्र सचिवांना सांगितले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे या समितीचे सदस्य आहेत, मात्र ते शुक्रवारी बैठकीला हजर नव्हते.

हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गोखले यांनी उत्तरे दिली. मात्र संरक्षण मंत्रालय याबाबत अधिक योग्य माहिती देऊ शकेल, असे ते म्हणाले. इस्लामिक सहकार्य संघटनेकडून भारताला कसा पाठिंबा मिळाला त्याची माहितीही गोखले यांनी सदस्यांना दिली.

समितीने भारतीय हवाई दलासह सशस्त्र दलांची समिती सदस्यांनी स्तुती केली आणि या वीरपूर्ण कामगिरीची जगाला माहिती देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 2:28 am

Web Title: explain to world reasons behind air strike inside pak parliamentary panel to foreign secretary
Next Stories
1 ‘ओआयसी’त दहशतवादावर प्रहार
2 भारताचे निमंत्रण कायम ठेवल्याने पाकिस्तानचा बहिष्कार
3 अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा इशारा ; दहशतवाद्यांना आश्रय न देण्याचे आवाहन
Just Now!
X