21 October 2019

News Flash

गुवाहाटीमध्ये मॉल बाहेर ग्रेनेडचा स्फोट, सहा जखमी

आसामच्या गुवहाटी शहरात झू रोडवर एका मॉल बाहेर बुधवारी रात्री आठच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला.

आसामच्या गुवाहाटी शहरात झू रोडवर एका मॉल बाहेर बुधवारी रात्री आठच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून स्फोट झालेल्या ठिकाणाला घेराव घालण्यात आला आहे.

जखमींना गुवहाटीच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या बॉम्ब स्फोटाचा तपास सुरु केला आहे.

First Published on May 15, 2019 9:00 pm

Web Title: explosion outside a mall on zoo road in guwahati