बलात्कारविरोधी कायदे सौम्य करण्याची गरज असून मुलांकडून कधीकधी चुका होतात, असे धक्कादायक आणि लज्जास्पद विधान करणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्यावर ट्विटरकरांनी शरसंधान साधले आहे.
बलात्कार म्हणजे मुलांकडून झालेली चूक असल्याचे मुलायम समजत असतील, तर त्यांचा समाजवादी नाही ‘नासमजवादी पक्ष’ असल्याचे टि्वटरकरांनी म्हटले आहे. काहींतर मुलायम यांना पाकिस्तान सैनिकाची वेशभूषा देऊन हँडपंप उखाडणाऱया अभिनेता सनी देओल समोर नेऊन ठेवावे असेही म्हटले आहे, तर एकाने आझम खान यांच्या कारगिल युद्धाच्या वादग्रस्त विधानानंतर मुलायमसिंग यांनी त्यापुढे जाऊन विधान करण्याची जणू स्पर्धाच पक्षात सुरू केली असल्याचे म्हटले आहे…