News Flash

सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंडदेखील ठोठावला

संग्रहित (PTI)

सरकारचं मत आहे त्याच्या अगदी भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह ठरत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका फेटाळून लावताना हे मत नोंदवलं आहे. “सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडूम मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करु शकला नाही. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच्याच आधारे ही याचिका करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:27 pm

Web Title: expressing views different from government is not sedition says supreme court sgy 87
Next Stories
1 पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये ‘दादा’ची राजकीय इनिंग सुरू होणार? बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात…
2 कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारसमोर नवं संकट; Sex CD प्रकरणात अडकले जलसंवर्धन मंत्री
3 महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं पडलं महागात; वकिलाची जामीनासाठी धावाधाव
Just Now!
X