केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरातील शंभर पैकी  सत्तर करवजावटी रद्द केल्या असल्या तरी गृह कर्जावरील दीड लाखांच्या अतिरिक्त वजावटीला मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन लाखांच्या व्यतिरिक्त दीड लाखांची अतिरिक्त वजावट देण्यात आली होती. जे लोक पहिल्यांदा ४५ लाखांपर्यंतचे घर घेत आहेत किंवा घेतले आहे त्यांना ही वजावट लागू होती ती आता मार्च२०२१ पर्यंत लागू राहणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना परवडणाऱ्या घरावर करसुटी जाहीर करण्यात आली होती ती मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना घरे मिळावीत व बांधकाम व्यवसायाची स्थिती सुधारावी  यासाठी या वजावटींना मुदतवाढ देण्यात आली. २ लाखाव्यतिरिक्त दीड लाखांची वजावट ही कलम ८० इइए अन्वये देण्याता आली होती. बांधकाम व्यावसायिकांना परवडणाऱ्या घरांसाठी  प्राप्तिकर कायदा ८० आयबीए अन्वये करसुटी देण्यात आली होती ती मार्च २०२१ पर्यंत लागू राहील. ४५ लाखांवरच्या  घरांनाही ही वजावट लागू करण्याची स्थावर मालमत्ता क्षेत्राची मागणी होती. ही वजावट लागू करण्यास आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी मात्र मान्य करण्यात आली आहे.