जगातील २०० पेक्षा जास्त देशांत करोना व्हायरसने पसरला आहे. जगात आजघडीला ६१ हजार ६४९ जणांचा या रोगानं बळी घेतला आहे. तर ११ लाख ५३ हजार १६ जणांना आतापर्यंत करोनाग्रस्त आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिकेत मागील २४ तासांत १४८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सहा हजारांपेक्षा जास्त जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे तर दोन लाख ३० हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. त्याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली, अशी असं मोदी यांनी ट्रम्प यांना अश्वासन दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करोना व्हायरस या महामारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती दिली. भारत आणि अमेरिका मिळून या महामारीचा सामना करतील असं दोन्ही नेत्यांचं चर्चेनंतर एकमत झालं आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र यावं लागेल.

चीनमधील वुहान शहरातून उद्भवेला करोनानं जगातील २०४ देशांत आपली पायामुळे रोवली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना व्हायरसला महामारी असे घोषित केलं आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे.