03 March 2021

News Flash

‘मी आत्महत्या करणार’, तरुणीचं स्टेटस पाहून फेसबुकने पोलिसांना केला फोन अन्…

आसाममध्ये एका अल्पवयीन मुलीने 'मी आत्महत्या करणार आहे' असं स्टेटस फेसबुकवर अपडेट केलं

(सांकेतिक छायाचित्र)

आसाममध्ये एका अल्पवयीन मुलीने ‘मी आत्महत्या करणार आहे’ असं स्टेटस फेसबुकवर अपडेट केलं, या स्टेटसबाबत फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयाला माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने आसाम पोलिसांना याबाबत माहिती दिली. फेसबुककडून माहिती मिळताच पोलिसांनी त्या मुलीचं लोकेशन शोधलं आणि तिला ताब्यात घेतलं.

आसाम पोलिसांनी ट्विटकरुन याबाबत माहिती दिली आहे. एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करणार असल्याचं स्टेटस अपडेट केलं आहे अशी माहिती आम्हाला फेसबुकने दिली. त्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये मुलीची ओळख पटवण्यात आली आणि तिला आम्ही ताब्यात घेतलं. तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं समुपदेशन करण्यात आलं. आता ती ठीक असून कुटुंबियांसोबत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, आम्ही पोहोचल्यावर घाबरुन ती मुलगी चुकीचं पाऊल उचलण्याची भीती होती, त्यामुळे पोलीस साध्या कपड्यांमध्ये तिथे पोहोचले होते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 8:59 am

Web Title: facebook alerts to assam police assam police stops girl from committing suicide
Next Stories
1 आत्महत्येचं नाटक पडलं महागात, पतीने स्वतःलाच संपवलं
2 डेटिंग साईटवरची मैत्री बेतली जिवावर, ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची हत्या
3 सीरियात आयसिसच्या हल्ल्यात २२० ठार
Just Now!
X