अमेरिकेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी फेसबुकद्वारे चुकीची माहिती पसरली जाऊ नये आणि त्यामुळे लोकांमध्ये अशांतता निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी राजकीय जाहिरातींवर बंदी घातली होती. या वेळी ही बंदी तात्पुरती असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, बंदी कधीपर्यंत असेल याबद्दलची अंतिम तारीख देण्यात आली नव्हती.

फेसबुकने हे स्पष्ट केले की, ते २०२० च्या अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या राजकीय आणि सामाजिक-विषयावरील जाहिरातींवरील बंदी हटवित आहोत. राजकीय उमेदवार, गट आणि इतर लोक गुरुवारपासून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिराती देऊ शकतील.

“आम्ही याविषयी बऱ्याच प्रतिक्रिया ऐकल्या आहेत आणि या निवडणुकीवेळी राजकीय आणि निवडणुकांसंदर्भातल्या जाहिरातींबद्दल अधिक शिकलो आहोत”, असे कंपनीने बुधवारी ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले. “याचा परिणाम म्हणून, या जाहिराती कशा योग्य आहेत आणि याचा आमच्या सेवांवर कसा परिणाम होतो याचा बारकाईने विचार करण्यासाठी आम्ही येत्या काही महिन्यांचा वापर करण्याचे ठरविले आहे”. ट्विटरने तर राजकीय जाहिरातींवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.