सोशल मीडियातील संवादाचे लोकप्रिय माध्यम असलेल्या फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग पुन्हा एकदा भारत भेटीवर येणार आहे. २८ ऑक्टोबरला भारतात येणार असल्याची माहिती खुद्द मार्क झकरबर्गनेच आपल्या फेसबुक पेजवर दिली आहे.
झकरबर्ग दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीला(आयआयटी दिल्ली) भेट देणार आहे. शिवाय तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचेही झकरबर्गने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कॅलिफोर्नियामध्ये फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी मोदी आणि झकरबर्ग यांच्याा संवादाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याआधी मार्क झकरबर्ग गेल्या वर्षी ९ आणि १० ऑक्टोबरला इंटरनेट डॉट ओआरजी संमेलनासाठी भारत भेटीवर आला होता.