25 September 2020

News Flash

डेटा लिक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड

कोणत्याही टेक कंपनीवरील दंडाची ही सर्वात मोठी रक्कम असणार आहे

अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने डेटा लिक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. कोणत्याही टेक कंपनीवरील दंडाची ही सर्वात मोठी रक्कम असणार आहे. यापूर्वी 2012 मध्ये गुगलला 154 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. फेसबुकवरील दंडाच्या शिफारसीवर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मार्च 2018 मध्ये फेसबुकच्या डेटा लिकचे सर्वात मोठे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर एफटीसीने फेसबुकला युझर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षेतील दोषी ठरवले होते.

ब्रिटनमधील कंसल्टन्सी फर्म केंब्रिज अॅनालिटीकाला डेटा लिक करण्याच्या प्रकरणात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेतील संसदेत हजर करण्यात आले होते. त्यानंतर एफटीसीने फेसबुक विरोधात तपास सुरू केला होता. त्यानंतर आपल्या विरोधात तपास सुरू झाल्यानंतर फेसबुकने 3 ते 5 अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर एफटीसीने या प्रकरणाचा तपास संपवण्यासाठी कंपनीवर ठोठावण्यात येणऱ्या दंडाची रक्कम निश्चित केली. दंडाची रक्कम ही फेसबुकला मिळालेल्या महसूलाच्या केवळ 9 टक्के इतकी आहे.

केंब्रिज अॅनालिटीकाने फेसबुकच्या 8.7 कोटी युझर्सचा डेटा मिळवला होता. तसेच या डेटाचा उपयोग कंपनीने 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 8:13 pm

Web Title: facebook fined 5 billion dollar cambridge analytica data leak mark zuckerberg jud 87
Next Stories
1 गोवा: भाजपात दाखल झालेल्या काँग्रेसच्या तीन आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
2 6 महिन्यांमध्ये 24 हजार अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार
3 राहुल मी तुमच्याकडून खुप काही शिकलो – रॉबर्ट वढेरा
Just Now!
X