20 February 2019

News Flash

फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

समाजमाध्यमांमध्ये अग्रेसर असलेल्या फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला पहिला दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी सांगितले.

फेसबुकला जवळपास सहा लाख ६० हजार डॉलर म्हणजे ४.५६ कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वाचे लक्ष आहे. जवळपास पाच कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्याचे समोर आले.

First Published on July 13, 2018 1:15 am

Web Title: facebook fined five million pounds