दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली महत्वाची बातमी आहे यवतमाळमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल. ३ लाखांचे कर्ज डोंगर वाटल्याने आणि नापिकी त्यातून येणारी निराशा या सगळ्याला कंटाळून यवतमाळच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपल्या सुसाइड नोटमध्ये या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहाव्या दिवसातील भारताच्या कामगिरीबद्दलची. तर मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांमध्ये सलमान खानबद्दल त्याची बहीण अर्पिताने एक लिहीलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…