दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले होतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यावर अनेक स्तरातून टिका होता आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे पंतप्रधानांच्या हत्येच्या कटावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या शाब्दिक वादासंदर्भातील. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…