दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांमध्ये पहिली सर्वात महत्वाची बातमी आहे मुंबईत आज झालेल्या शेतकरी मोर्चाची. पहाटेपासून या मोर्चासंदर्भात अनेक घडामोडी घडताना दिसल्या. अगदी राजकारण्यांपासून ते सिने कलाकारांपर्यंत अनेकांना या मोर्चाची दखल घ्यावी लागली. याशिवाय दुसरी महत्वाची बातमी म्हणजे काठमांडूमध्ये एक भिषण विमान अपघात झाला असून त्यामध्ये अनेकजण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय टिटवाळा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास ही राज्यातील तर तारक मेहता का उल्टा चष्मामधून दयाबेनची एक्झीट ही मनोरंजन क्षेत्रातील महत्वाची बातमी. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…